Home > News Update > इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ केके अग्रवाल यांचं कोरोनामुळे निधन

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ केके अग्रवाल यांचं कोरोनामुळे निधन

कोरोनाचा कहर वाढतच‌ असून इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) माजी अध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉक्टर केके अग्रवाल यांचं कोरोनामुळे दिल्लीत काल निधन झालं. केके अग्रवाल 62 वर्षांचे होते आणि जवळपास एक आठवड्यापासून ते व्हेंटिलेटरवर होते.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ केके अग्रवाल यांचं कोरोनामुळे निधन
X

डॉ. अग्रवाल यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते कोरोनाची लागण झाल्यानंतर केके अग्रवाल यांना राजधानी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. इथे त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. परंतु त्यांना वाचवण्यात अपयश आलं."

केके अग्रवाल यांचा मजेशीर व्हिडीओ व्हायरलयं

दाच्या जानेवारी महिन्यात केके अग्रवाल यांचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये केके अग्रवाल यांच्या पत्नी त्यांना ओरडत असल्याचं दिसत होत्या.

कारमध्ये लाईव्ह व्हिडीओ करताना केके अग्रवाल यांनी आपण कोरोनाची लस घेतल्याचं सांगितलं. हा लाईव्ह व्हिडीओ पाहून त्यांच्या पत्नीने तातडीने फोन करुन माझ्याशिवाय तुम्ही लस का घेतली, अशी विचारणा करत दम भरला. यावर केके अग्रवाल यांनी सांगितलं की, मी केवळ तिथे लसीची माहिती घेण्यासाठी गेलो होतो आणि मला लस दिली."डॉ केके अग्रवाल यांचं यूट्यूब चॅनल असून ज्यावर ते व्हिडीओच्या माध्यमातून कोविड-19 सह इतर आजारांबाबत लोकांना माहिती आणि सल्ला देत असत. डॉ अग्रवाल यांना सुमारे दोन आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवलं होतं.डॉ. केके अग्रवाल कार्डिओलॉजिस्ट होते आणि हार्ट केअर फाऊंडेशन ऑफ इंडियाचे प्रमुख होते. डॉ. अग्रवाल यांना 2010 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

Updated : 18 May 2021 10:02 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top