अनिल देशमुख हाजीर हो..! ; अनिल देशमुख यांना 16 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
X
मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने बजावलेल्या समन्सकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 16 नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
मनी लाँड्रिंगप्रकरणी वारंवार ईडीकडून समन्स मिळून देखील चौकशीला हजर न राहिल्याने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी देशमुख यांच्याविरोधात शुक्रवारी कायदेशीर कारवाईला सुरूवात केली आहे. भारतीय दंडसंहिता १७४ अंतर्गत न्यायालयाने माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावर ही कारवाई सुरू केली आहे. ईडीने देशमुख यांच्याविरोधात केलेल्या अर्जावर न्यायदंडाधिकारी आर. एम. नेर्लीकर यांच्यापुढे सुनावणी होती. ईडीने बजावलेले समन्स आरोपी, त्यांची मुलगी किंवा त्यांच्या वतीने वकिलांनी घेतले. प्राथमिक दृष्ट्या त्यांच्याविरुद्ध केस होत आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.