Home > News Update > आदिवासींच्या हक्कांसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ मैदानात, सरकारला दिला इशारा

आदिवासींच्या हक्कांसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ मैदानात, सरकारला दिला इशारा

आदिवासींच्या हक्कांसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ मैदानात, सरकारला दिला इशारा
X

आदिवासींच्या आरक्षणातील घुसखोरीबाबत महाराष्ट्र शासनाने अनुचित निर्णय घेऊ नये व पेसा आदिवासी पात्रता धारक भरती तातडीने व्हावी या मागण्यांसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात 30 सप्टेंबर पासून मुंबई मंत्रालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलकांच्या मागण्या कोणत्या आहेत?

1)कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून पेसा आदिवासी तरुणांना ताबडतोब नेमणूका द्याव्यात

2) धनगरांच्या आदिवासी मधील घुसखोरीचा

कोणताही निर्णय शासनाने घेऊ नये.

3) धनगरांच्या बाजूचा कोणताही अहवाल स्वीकारण्या पूर्वी आधी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस , मुंबई यांचा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा.

4) अधिसंख्य पदां मुळे रिक्त झालेल्या साडे बारा हजार हून अधिक जागांवर आदिवासी तरुणांची भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी.

धनगर धनगड नावाचा घोळ नक्की काय?

आदिवासी हक्कासाठी काम करणाऱ्या डॉ. संजय दाभाडे यांनी धनगड आणि धनगर हा घोळ काय आहे याबाबत पुढील माहिती दिली.

आदिवासींमध्ये धनगर घुसखोरीचे संकट उभे ठाकले आहे. धनगर हे ओबीसी व भटके असून त्यांचा महाराष्ट्राच्या 45 जमातीच्या यादीतील 36 क्रमांकावरील एन्ट्री ओरान , धांगड ह्या आदिवासी जमातिशी काडी इतकाही संबंध नाही. धनगर मेंढपाळ आहेत तर धांगड हे आदिवासी ओरांन शेतमजूर आहेत.

36 क्रमांकावरील एन्ट्री आमच्या साठीच आहे असा खोटारडा प्रचार व युक्तिवाद धनगर नेते करत आहेत. त्यांची अशी याचिका 16 फेब्रुवारी 2024 च्या निकालपत्रात बॉम्बे उच्च न्यायालयाने तर 20 मे 2024 च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने अक्षरशः फेटाळून लावलेली आहे.


तरीसुद्धा महाराष्ट्र सरकार म्हणजे महायुतीचे सरकार धनगरांच्या मतांवर डोळा ठेवत त्यांच्या मागणीला खतपाणी घालत असल्याचे दिसत आहे. त्या दिशेने पावले टाकत महाराष्ट्र सरकारने दोन समित्या गठीत करत धनगरांच्या अनुकूल अहवाल प्राप्त करण्याची तयारी सुरू केली आहे.

या मागण्यांसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे स्वतः 30 सप्टेंबर पासून मुंबईमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत अशी माहिती आदिवासी आदिवासी हक्क नेते डॉ. संजय दाभाडे यांनी दिली आहे.

Updated : 27 Sept 2024 5:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top