कृषी कायदे मागे घेतल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार
कृषी कायदे मागे घेतल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार गुजरातमध्ये सुरू असलेल्या नैसर्गिक आणि शून्य-बजेट शेतीवर सुरू असलेल्या शिखर परिषदेतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांना संबोधित करणार
X
नवी दिल्ली// गुजरातमध्ये सुरू असलेल्या नैसर्गिक आणि शून्य-बजेट शेतीवर सुरू असलेल्या शिखर परिषदेतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांना संबोधित करणार आहेत. नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय तीन दिवसीय शिखर परिषद १४ डिसेंबरपासून सुरू झाली असून आज या परिषदेचा समारोप होणार आहे. दरम्यान, पीएम किसान सन्मान निधीच्या १०व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या १२ कोटी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. गुजरामध्ये सरकारने नैसर्गिक शेती पद्धतींवर आयोजित केलेल्या कृषी कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला पंतप्रधान मोदी ऑनलाइन संबोधित करतील. या कार्यक्रमामध्ये सुमारे ५,००० शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
कार्यक्रम सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल आणि तो दुपारी एक पर्यंत चालेल असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले.
देशभरात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्ते पंतप्रधानांचे भाषण ऐकणार आहे. यावेळी नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब केल्याने होणार्या फायद्यांविषयी शेतकर्यांना सर्व आवश्यक माहिती पुरविली जाईल. इतर पारंपारिक पद्धती जसे की मातीला बायोमासने आच्छादित करणे किंवा मातीला संपूर्ण वर्षभर हिरव्या आच्छादनाने झाकणे, अगदी कमी पाण्याच्या उपलब्धतेच्या परिस्थितीतही पहिल्या वर्षापासून सतत उत्पादकता सुरु करण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान,कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.