Home > News Update > Budget session 2022 : इतिहासात प्रथमच राज्यपालांनी अभिभाषण रोखले, राज्यात घटनात्मक पेच निर्माण होणार?

Budget session 2022 : इतिहासात प्रथमच राज्यपालांनी अभिभाषण रोखले, राज्यात घटनात्मक पेच निर्माण होणार?

Budget session 2022 : इतिहासात प्रथमच राज्यपालांनी अभिभाषण रोखले, राज्यात घटनात्मक पेच निर्माण होणार?
X

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यातच राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी गोंधळ घातल्याने राज्यपालांनी आपले अभिभाषण थांबवले. त्यामुळे राज्यात घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन गदारोळ करण्यास सुरुवात केल्यामुळे राज्यपालांनी आपले अभिभाषण थांबवले आणि राज्यपाल निघून गेले. त्यामुळे इतिहासात प्रथमच असा प्रकार पहायला मिळाल्याने घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्या विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात जोरदार पडसाद उमटले. तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. त्यानंतर निर्माण झालेल्या गदारोळात राज्यपालांनी आपले भाषण थांबवले. त्यानंतर राज्यपाल निघून गेले. त्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्यावरून टीका केली होती. तर विरोधकांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिला होता. त्यापार्श्वभुमीवर राज्यपालांनी भाषण न करता पटलावर ठेऊन तडक निघून जाणे ही घटना इतिहासात प्रथमच घडली आहे. त्यामुळे राज्यात घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Updated : 3 March 2022 2:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top