मंदिरे उघडल्यानंतरही लोककलावंतांच्या कार्यक्रमांना परवानगी नसल्याने लोककलावंतांनी व्यक्त केली नाराजी
X
लोककलावंतांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचं म्हणत औरंगाबाद येथील लोककलावंतांनी शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रशासनाने राज्यातील सर्व मंदिरांचे दारे उघडली केली. त्यामुळे लोककलावंतांना काही कामे मिळतील अशी अपेक्षा होती. प्रत्येक मंदिरात नवरात्र उत्सवात सनई चौघडे वाजायला सुरुवात झाली, मात्र त्याचबरोबर गोंधळी, पोतराज ,वाघ्या - मुरळी,नाटक , लोकनाट्य करणाऱ्या मंडळींना शासनाने परवानगी दिली नाही, यामुळे या लोककलावंतांचा यंदाचा सण देखील असाच जाणार असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या लोककलावंतांवर अजून सुद्धा उपासमारीची वेळ आहे, मंदिरे उघडल्यानंतर सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमांना नवरात्र उत्सवात परवानगी न मिळाल्याने अनेकांनी केलेली तयारी वाया गेली आहे, मात्र काही मंदिरात सनई-चौघडे वाजवायला सुरुवात झाली. प्रशासनाने लोककलावंतांकडे लक्ष देऊन लोककलावंतांना मदत करण्याची गरज लोककलावंतांनी माध्यमांशी बोलताना बोलून दाखवली आहे.