बजेट २०२१ : आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी साडे ७ हजार कोटींचा डोस
X
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२१-२२ या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अर्थमंत्र्यांनी सगळ्यात आधी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी मोठी तरतूद करण्याची घोषणा केली. राज्यात आणखी जिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची घोषणा त्यांनी केली. त्य़ाचबरोबर महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये पायाभूत आरोग्य सुविधा उभारण्याचे नियोजन असून महापालिका क्षेत्रांकरीता येत्या ५ वर्षात ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली.
त्याचबरोबर भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेच्या अनुषंगाने ज्या रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना नाहीत तिथे अशी व्यवस्था तयार करण्याचा निर्णय़ त्यांनी जाहीर केला. त्याचबरोबर सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, नाशिक आणि सातारा या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणाही अजित पवार यांनी केली. तर राज्यातील ११ नर्सेस प्रशिक्षण शिबिरांचे कॉलेजेसमध्ये रुपांतर करण्याची घोषणा त्यांनी केली. लातूर येथील रुग्णालयाच्या मारतीसाठी ७३ कोटी. ससून हॉस्पिटल्या कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी २८ कोटी रुपये देणय्त येणार आहे.