Home > News Update > Up election : उत्तरप्रदेशचा निवडणुकीचा आज पहिला टप्पा; पश्चिम उत्तरप्रदेशात 60.17 टक्के मतदान

Up election : उत्तरप्रदेशचा निवडणुकीचा आज पहिला टप्पा; पश्चिम उत्तरप्रदेशात 60.17 टक्के मतदान

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी, उत्तर प्रदेशच्या ४०३ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असल्याचे सांगितले आहे.

Up election :  उत्तरप्रदेशचा निवडणुकीचा आज पहिला टप्पा;  पश्चिम उत्तरप्रदेशात 60.17 टक्के मतदान
X

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी, उत्तर प्रदेशच्या ४०३ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असल्याचे सांगितले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये सध्या पहील्या टप्प्यातील मतदानाला आज म्हणजेच गुरवार दिनांक १० फेब्रुवारी पासुन सुरु आहे. दिवसभरात 60.17 टक्के मतदान झाले आहे. या टप्प्यात तब्बल ६२३ उमेदवार रिंगणात आहेत आणि सुमारे २.२७ कोटी लोक मतदानासाठी पात्र आहेत.उत्तर प्रदेशमध्ये १०, १४ , २०, २३ , २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि सात मार्चला मतदान होणार आहे.

१० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. करोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला आहे. कोविडमुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

राज्याच्या पश्चिम पट्ट्यातील ११ जिल्ह्यांतील एकूण ५८ मतदारसंघात मतदान सुरू आहे. यापैकी बहुतांश जागांवर जाटांचे वर्चस्व आहे ज्यांनी गेल्या वर्षी राष्ट्रीय राजधानीत केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीने लढलेली पहिली फेरी, जिथे सत्ताधारी भाजपला समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या झालेल्या युतीकडून कडवे आव्हान मिळण्याची अपेक्षा आहे, शेतकरी आंदोलनाच्या परिणाम काय होईल याचा निकाल या निवडणुकीत होऊ शकतो.

Updated : 10 Feb 2022 10:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top