Home > News Update > मुलींची पहिली शाळा 'जमीनदोस्त '

मुलींची पहिली शाळा 'जमीनदोस्त '

मध्यरात्रीच्या सुमारास जागा महानगरपालिकेच्या ताब्यात.

मुलींची पहिली शाळा जमीनदोस्त
X

मुलींच्या पहिल्या शाळेची सुरुवात करण्यात आलेल्या पुण्यातील भिडे वाडा इमारत सक्तीची कारवाई करून ताब्यात घेण्याची कार्यवाही पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या केली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेत चालू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेच्या इमारतीवर सोमवारी रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने कारवाई करत भिडेवाडा जमीनदोस्त करण्यात आला.

पुणे महानगरपालिकेने भिडे वाड्यामध्ये राष्ट्रीय स्मारक केले जावे. यासाठी तेरा वर्षांपूर्वीच महानगरपालिकेमध्ये ठराव केला होता. मात्र या जागेसंदर्भामध्ये न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. या खटल्यासंदर्भामध्ये उच्च न्यायालयाने पुणे महानगरपालिकेच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायालयाचा हा निर्णय पुढे कायम ठेवला आणि पुढील महिन्याभराच्या आत मध्ये महानगरपालिकेकडे भिडे वाड्याची जागा ताब्यात करून घेण्याचे आदेश न्यायालयाने भाडेकरू व घरमालक यांना दिले.

भाडेकरू यांनी न्यायालयामध्ये वेळोवेळी केलेल्या याचिकांमुळे भिडे वाडा ताब्यात घेण्यासंदर्भामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. जागा ताब्यात घेण्यासाठी मुदतवाढ द्यावी या शेवटच्या याचिकेची फेटाळणी न्यायालयाने सोमवारी केली यानंतर संबंधित जागा ताब्यात घेण्याची कारवाई महानगरपालिकेने सुरू केली.

भिडे वाड्याच्या संबंधित जागेवर राष्ट्रीय स्मारक होणार असून. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विशेष कार्याचा उल्लेख करणाऱ्या. त्याच सोबत फुले दांपत्यांच्या कार्याच्या गौरवासाठी स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे.


Updated : 5 Dec 2023 9:05 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top