स्मार्ट सिटी तर्फे महिलांसाठी पहिली शहर बस सेवा...
X
औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवेचा चौथा वर्धापन दिन आज मुकुंदवाडी डेपो येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या निमित्ताने स्मार्ट सिटी चे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी महीलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली.
औरंगाबाद महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी चे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटी बस विभाग पूर्ण क्षमतेने बस सेवा चालवत आहे. विविध प्रश्नांवर मात करत औरंगाबाद स्मार्ट सिटीने गेल्या चार वर्षांपासून शहर बस सेवा नियमितपणे सुरु ठेवली आहे. नागरिकांना या बस सेवेचा लाभ मिळत आहे. आतापर्यंत या बस सेवेचा लाभ जवळपास दिडशे कोटी प्रवाशांनी घेतला आहे. या काळात १५० बस स्थानक, ई-तिकीट, स्मार्ट कार्ड व अन्य सेवेंचा लाभ नागरिकांना मिळाला आहे.
शहर बस सेवेचा एक महत्वाचा भाग म्हणून जाधववाडी मंडी येथे नवीन बस डेपो बांधण्यात येत आहे. विशेष म्हणजे सिटी बस सेवेच्या पाचव्या वर्षी औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे ३५ इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार आहेत. अशी माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी चे सीईओ डॉ.अभिजित चौधरी यांनी दिली आहे. या बसेस वातानुकूलित असणार आहेत. आणि स्वच्छ हवेसाठी महत्वाच्या ठरणार आहेत. औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवेचा चौथा वर्धापन दिन मुकुंदवाडी डेपो येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात जी-२० अंतर्गत वुमेन-२० चे प्रतिनिधी मंडळ भेंट देणार आहे. यानिमित्ताने महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याबाबत मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी घोषणा केली. तसेच चालक व वाहक यांना सुरक्षा व अपघातासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. अशी माहिती सौरभ जोशी यांनी दिली आहे.