अनधिकृत फेरीवाल्यांमुळे अधिकृत स्टॉल धारकांना आर्थिक फटका
X
कल्याण : दिवाळीनिमित्त नागरिकांची बाजारात खरेदीसाठी मोठी झालेली पाहायला मिळत आहे. यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून फटाके आणि दिवाळीच्या विविध वस्तूंसाठी अधिकृत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी स्टोल धारकांकडून महापालिका काही रक्कम देखील आकारण्यात आली आहे. तसेच सगळ्या स्टॉल धारकांकडून पोलीस, अग्निशमन दल आणि पालिकेच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांना वचक बसावा यासाठी पालिकेकडून हे अधिकृत स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. अशाच प्रमाणे डोंबिवलीतील भागशाळा मैदान परिसरात महानगरपालिकेचे सगळे दस्तावेजची पूर्तता करत येथील काही व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेचे स्टॉल भाडेतत्त्वावर घेतले आहे. या स्टॉलमध्ये लाखोचा माल देखील भरला आहे, मात्र या परिसरात अनधिकृत फेरीवाले जागोजागी ठाण मांडून बसल्यामुळे या अधिकृत स्टॉल धारकांचे नुकसान होत असल्याचे स्टॉल धारकांचे म्हणणे आहे. अधिकृत स्टॉलसाठी धारकांना पालिकेकडून रक्कम भरावी लागते. मात्र, अनधिकृतपणे फेरीवाले कुठेही स्टॉल लावत असल्याने या स्टॉल चालकांचे आर्थिक नुकसान होत असून या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झाली तर आम्हाला देखील चार पैसे मिळतील असं अधिकृत स्टॉल धारकांचे म्हणणे आहे.