मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तमाशा कलावंतांना आर्थिक मदत
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त संगमनेर येथील शिवसैनिकांनी तमाशा कलावंतांना 51 हजार रूपयांची आर्थिक मदत केली आहे. तमाशा कलावंत रघुवर खेडकर यांना मदतीचा 51 हजार रूपयांचा धनादेश सोपवण्यात आला.
X
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी न करता गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत संगमनेर येथील शिवसैनिकांनी तमाशा कलावंतांना 51 हजार रूपयांची आर्थिक मदत केली आहे. तमाशा कलावंताचे लॉकडाऊनच्या कालावधीत झालेले हाल अवघ्या महाराष्ट्राने बघितले, म्हणून शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत ही मदत केली आहे.
तमाशा कलावंत रघुवर खेडकर यांच्याकडे मदतीचा 51 हजार रूपयांचा धनादेश सोपवण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी खेडकर कुटुंबाला कोरोनाने घेरले होते. यात काही कुटुंबीयाचा दुर्दैवी मुत्यू झाला होता. या कुटुंबाच्या मदतीला शिवसैनिक धावून गेले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका प्रमुख जनाभाऊ आहेर, तालुका युवा सेना प्रमुख गुलाब राजे भोसले ,गणेश धात्रक, रंगनाथ फटांगरे ,अक्षय ,संदीप राणे ,श्याम राणे आदी शिवसैनिकांनी हा मदतीचा धनादेश खेडकर यांच्याकडे सुपुर्द केला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या शिकवणीप्रमाणेच संगमनेरच्या शिवसैनिकांनी काम केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.