Home > News Update > Truck Driver Strike | सर्वात मोठी बातमी : अखेर ट्रक चालकांचा संप मागे

Truck Driver Strike | सर्वात मोठी बातमी : अखेर ट्रक चालकांचा संप मागे

Truck Driver Strike | सर्वात मोठी बातमी : अखेर ट्रक चालकांचा संप मागे
X

Truck Driver Strike : केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध दर्शवत काम बंद आंदोलन पुकारले होते. ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न झाल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे मागील ३ दिवसांपासून 'हिट अँड रन' (Hit And Run) कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं (Truck And Tanker Driver Strike ) संप पुकारण्यात आला होता.

दरम्यान आता देशभरातील ट्रक चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हिट अँड रन कायद्यामुळे देशभरातील ट्रक चालक संपावर गेले होते. केंद्र सरकारचं आणि ट्रक चालकांच्या संघटनांशी सकारात्मक चर्चा झाल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे.


Updated : 3 Jan 2024 9:15 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top