Home > News Update > अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
X

नाशिक येथील नांदगाव रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय साकोरा या शाळेच्या विद्यार्थ्यांने आज अनोखे आंदोलन केले. शाळेत नाही तर थेट नाशिक जिल्हा बॅंकतच शिक्षणाचे धडे गिरवण्याची सुरूवात केलीय. रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी वाढीमुळे सध्या असलेली शाळा अपूरी पडत आहे. त्यासाठी त्यानी नवीन वर्गखोल्या बांधायच्या असल्याचे सांगितले.

दरम्यान नाशिक जिल्हा बॅंकत शाळेच्या नावावर साडे पंधरा लाखाची ठेव आहे. ही ठेव नाशिक जिल्हा बॅंक देत नसल्याने विद्यार्थ्यांनाचं आंदोलन करण्याची वेळ आली. अखेर या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांना यश आलंय. काही तासातच या शाळेचा विषय प्रश्न मार्गी लागला असल्याच सांगितले

यावर काही विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की आमचे पैसे बॅंकेत अडकले आहेत. त्यामुळे आम्ही आलो आहोत आम्हाला वर्गात बसायला जागा नाही एका वर्गखोलीत १०० विद्यार्थी कसे बसणार असा सवाल करतं आमचे पैसे लवकरात लवकर मिळावे यासाठी विनंती करत असल्याच एकाविद्यार्थींनी म्हटलं आहे तर दुसऱ्या विद्यार्थीने सांगितले की शाळेचे छताला गळती लागली आहे पावसात आम्ही ते केव्हा ही पडू शकते त्यामुळे आम्ही जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असतो. तर तीसरी विद्यार्थी म्हणाले की हे आमच्या शाळेच्या हक्काचे पैसे आहेत ते त्यांनी आम्हा द्यावे. आमची एकच समस्या आहे, की बसायला वर्ग नसल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितले.

परंतु या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अखेर नाशिक जिल्हा बॅंकने त्यांना शाळेचे पैसे (ठेवी) देण्याचं मान्य केलं असल्याने काही टप्प्यात हे पैसे शाळेच्या कामाकरिता देणार असल्याचे सांगितले त्यातील पहिला २ लाख ५० हजार एवढी रक्कम शाळेच्या खात्यात जमाकरण्यात आली असुन पुढील उर्वरीत रक्कम टप्प्या टप्प्याने वर्ग करणार असल्याचं सागण्यात आलं आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात यश आले आहे.



Updated : 6 Oct 2023 5:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top