अखेर तिढा सुटला..! उदयनराजे साताऱ्यातून लोकसभेचे मैदान गाजवणार
X
राज्यात लोकसभा निवडणूकीची रणधूमाळी सुरू असातानाच मागच्या काही दिवसांपासून सातारा लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नव्हता. आज हा तिढा सुटला असून महायुतीकडून उदयनराजेंना सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे असणार आहेत. त्यामुळे आता या दोन्ही उमेदवारांमध्ये लोकसभा निवडणूकीची लढत पहायतला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वींच उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत पहायला मिळाले होते. मात्र आज त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, लोकसभेसाठी मंगळवारी भारतीय जनता पक्षाकडून बारावी यादी जाहीर करण्यात आली. त्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव उदयनराजे भोसले यांचे नाव प्रामुख्याने असल्याचे पाहायला मिळाले.
अखेर साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना भाजपची उमेदवारी जाहीर
— Prashant Kadam (@_prashantkadam) April 16, 2024
अजित पवार गटाचा दावा असलेल्या जागेवर भाजपच्या तिकिटावर ते लढणार आहेत
2019 मध्ये ते राष्ट्रवादीतून लढले त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये गेले पण पोटनिवडणुकीत पराभव
त्यानंतर भाजपने त्यांना… pic.twitter.com/YYvuHQlF0g