Home > News Update > कोवीड पॉझिटिव्ह असूनही अभिनेत्रीचा चित्रीकरणात सहभाग, गुन्हा दाखल

कोवीड पॉझिटिव्ह असूनही अभिनेत्रीचा चित्रीकरणात सहभाग, गुन्हा दाखल

कोवीड पॉझिटिव्ह असूनही अभिनेत्रीचा चित्रीकरणात सहभाग, गुन्हा दाखल
X

कोरोनाची बाधा झाली असतानाही एका सिने अभिनेत्रीने चित्रीकरणात सहभागी होत कोरोनाचे नियम तोडल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरीतील ओशिवरा परिसरात ही अभिनेत्री राहते. तिच्यावर ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चित्रपट अभिनेत्रीला कोविड बाधा झालेली असतानाही त्या सार्वजनिक परिसरांमध्ये वावरल्या. एवढेच नाही तर त्यांनी चित्रीकरणामध्येही भाग घेतला. परिणामी कोविड संसर्ग इतर व्यक्तींना होऊ शकेल, अशा प्रकारची कृती केल्यामुळे आणि कोविड विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महापालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित चित्रपट अभिनेत्रीची कोविड चाचणी करण्यात आली होती. ११ मार्च २०२१ रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरातच विलगीकरणात राहणे बंधनकारक असताना, नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक परिसरातील वावर सुरू ठेवला आणि यानंतर १४ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी उशिरा महापालिकेचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले. तेव्हा वारंवार विनंती करूनही त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यासही त्यांनी नकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर विलगीकरणाचा शिक्का त्यांच्या हातावर नियमानुसार उमटविण्यात आला. पण तरीही त्यांनी विलगीकरणाचे नियम मोडून सार्वजनिक ठिकाणी फिरण्यासह इतरांना बाधा होईल असे कृत्त केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated : 15 March 2021 1:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top