भाजप आमदार गणेश नाईकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
X
भाजपाचे (Bjp)आमदार गणेश नाईक(Ganesh naik) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.गणेश नाईक यांच्याविरोधात आता भारतीय दंड विधान संहिता ३७६ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश नाईक यांच्याविरोधात यांच्याविरोधात याआधीच मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गणेश नाईक यांच्या बरोबर गेल्या २७ वर्षापासून लिव्ह इन रिलेशनमध्ये असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला होता.लिव्ह इन रिलेशनमधून मी एका मुलाला जन्म दिला आहे. परंतु, या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला असून आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा, आरोप या महिलेने केला होता. शनिवारी गणेश नाईक यांच्याविरोधात २०१० ते २०१७ दरम्यान पीडितेवर शारीरिक आणि मानसिक शोषण करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मार्च २०२१ मध्ये सीबीडी येथील गणेश नाईक यांच्या कार्यालयात स्वत: कडील रिव्हॅालव्हर आपल्यावर रोखून ठार मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप करत संबंधित महिलेने सीबीडी(CBD) पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर ही गुन्हा दाखल झाला नसल्याने पीडित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे धाव घेत तक्रार केली. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर पोलिसांनी आता गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.