मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल; विनोद पाटलांची माहिती
टीम मॅक्स महाराष्ट्र | 20 Jun 2021 3:30 PM IST
X
X
औरंगाबाद: मराठा समाजाला आरक्षण देता येत नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला होता. त्याविरोधात आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
50 टक्के आरक्षणाची मर्यादा ठरवणाऱ्या निकालाला आव्हान देत, मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर पुनर्विचार करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची अपेक्षा असताना, पाटील यांनी त्यापूर्वी याचिका दाखल केली आहे. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा समाजाच्या वतीने अँड. संदीप देशमुख यांच्यामार्फत Review Petition दाखल केली गेली आहे.
Updated : 20 Jun 2021 3:30 PM IST
Tags: Maratha Reservation
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire