महापालिकेसमोर आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
टीम मॅक्स महाराष्ट्र | 2 Jun 2021 3:30 PM IST
X
X
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेऊन शहर आणि जिल्ह्यात येत्या 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, याला सोलापूर शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध करत माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वात महापालिकेसमोर आंदोलन सुरु केलं. कांही वेळातच आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Updated : 2 Jun 2021 3:30 PM IST
Tags: case Businessman Solapur protesting lockdown
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire