Home > News Update > गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा - गुणरत्न सदावर्ते

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा - गुणरत्न सदावर्ते

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा - गुणरत्न सदावर्ते
X

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात आणि मेळाव्यात मोठी गर्दी उसळली. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील स्वतः मंचावर होते. यांच्या समोर पार पडणाऱ्या कार्यक्रमात सर्व नियम आणि आवाहन धाब्यावर बसवले गेल्याचं म्हणत, गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार व दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध बेकायदा मंडळी करणे आणि कोरोना नियम न पाळणे याबाबत भारतीय संविधानातील आर्टिकल 21 नुसार इतरांच्या जीवन जगण्याबाबत संक्रमणाचा धोका उद्भवतो म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी तक्रार केली आहे.

त्यानंतर भा द वी कलम 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेलं नाही असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

Updated : 7 Sept 2021 2:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top