Home > News Update > सात जन्म ही पत्नी नको म्हणून पुरूषांच्या पिंपळाला प्रदक्षिणा

सात जन्म ही पत्नी नको म्हणून पुरूषांच्या पिंपळाला प्रदक्षिणा

सात जन्म ही पत्नी नको म्हणून पुरूषांच्या पिंपळाला प्रदक्षिणा
X

एकीकडे अनेक ठिकाणी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिला वडाच्या झाडाची पूजा करत आहेत. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळो आणि सात जन्म हाच पती मिळो अशी प्रार्थना करत आहेत. तर दुसरीकडे मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील पत्नी पीडित पुरुष आश्रमामध्ये पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे.

महिलांवरील पुरुषी अत्याचार रोखण्यासाठी अनेक कायदे आहेत. पण महिलांनी पुरूषांवर अत्याचार केल्यास कायदा नाही, अशी भूमिका या पत्नी पीडित आश्रम संघटनेच्या लोकांनी मांडली आह.

" आमच्या बायका वट वृक्षाची पूजा करतील व सात जन्म आम्हाला हाच नवरा मिळावा अशी मागणी करतील. त्यामुळे आम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी यमराजाला व मुंजाला साकडे घातले आहे की, हे यमराजा आमच्या बायकांनी आम्हाला इतका त्रास दिला आहे की अशा बायकांबरोबर सात जन्म काय, सात सेकंद देखील संसार करू शकत नाहीत. त्यामुळे या बायकांची प्रार्थना यशस्वी होऊ नये असे साकडे या पुरूषांनी घातल्याचे सांगितले.

पुरुषांच्या बाजूने कायदे नसून महिलांना कायद्याचे झुकते माप असल्याने अनेक महिला कायद्याचा गैरवापर करत पुरुषांवर अन्याय करीत आहे. त्यामुळे पुरुषांसवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन करावा, अशी मागणीही या लोकांनी केली आहे.

Updated : 24 Jun 2021 1:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top