Home > News Update > रायगडावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना चोप

रायगडावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना चोप

रायगडावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना चोप
X

शिवजयंतीच्या निमित्ताने काही तरुण हे किल्ले रायगडवर आले होते. पण त्यांनी यावेळी दारु पिऊन इथे गोंधळ घातल्याचा आरोप करत किल्ल्यावरील काही तरुण आणि तरुणींनी या तरुणांना चांगलाच चोप दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर असे अपमानकारक कृत्य खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही यावेळी या तरुणांना देण्यात आला आहे. तसेच जारु पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी या तरुणांविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किल्ले रायगड हा छत्रपती शिवाजी महाजारांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला आहे आणि महाराष्ट्रासाठी ते एक तीर्थक्षेत्रसारखे ठिकाण आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांनी सभ्यता राखावी तसेच गडाला काही नुकसान होणार नाही असे आवाहन वारंवार केले जाते. पण अनेकवेळा काही जण इथे दारु पिऊन धिंगाणा घालत असल्याचे प्रकार घडत असतात.

Updated : 20 Feb 2021 10:30 AM IST
Next Story
Share it
Top