Home > News Update > फादर हर्मन बाकर यांचे वृद्धापकाळाने युरोप मध्ये निधन

फादर हर्मन बाकर यांचे वृद्धापकाळाने युरोप मध्ये निधन

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दुष्काळ निवारणात जलसंधारण हा मूलमंत्र सामान्य नागरिकांना देताना त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण करणारे जलसंधारणाचे प्रणेते आणि राज्याच्या पाणलोट विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे व जर्मन चा सर्वोच्च नागरी पुरस्कार विजेते फादर हरमन बाकर यांचे वयाच्या 98 वर्षी युरोपमध्ये निधन झाले आहे .

फादर हर्मन बाकर यांचे वृद्धापकाळाने युरोप मध्ये निधन
X

इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम चळवळीचा अवलिया हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंड या निसर्गरम्य देशात जन्मलेल्या फा. हर्मन बाखर या अवलियाने आपल्या आयुष्याच्या ९७ वर्षातील ६० वर्ष भारतात विशेषतः महाराष्ट्रात घालवली. दुष्काळी भागाला माथा ते पायथा उपचार पद्धतीने माती अडवा पाणी जिरवा हा मंत्र दिला. या करिता जर्मन सरकारकडून नाबार्ड बँकेमार्फत भारतात जगप्रसिध्द असा इंडोजर्मन पाणलोट क्षेत्र कार्यक्रम सुरु करून या प्रकल्पाचे प्रणेते बनले..

स्वतः श्रमदान करत लोकांना श्रमदान व एकीचे महत्व पटवून दिले. गावकऱ्यांचा सहभाग मिळविला. मा.क्रिस्पिनो लोबो व डॉ. मनिषा मार्सेला यांचे बरोबर वॉटर संस्थेची स्थापना करून भारतभर अनेक गावांमध्ये इंडोजर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम पोहचविला.

या महान कार्याप्रती जर्मन सरकारने त्यांना "फेडरल क्रॉस ऑफ दि ऑर्डर ऑफ मेरीट " हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतात येऊन जर्मन वित्त मंत्री यांनी प्रदान केला. तसेच महाराष्ट्र सरकार ने सन१९९४ मध्ये "कृषी भूषण" सन १९९६ मध्ये "वनश्री" व सन २०१० मध्ये "डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न" पुरस्कार देऊन सन्मानित केले. केंद्र सरकारच्या कृषी धोरणाबाबतच्या डॉ. स्वामीनाथन समिती चे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

फादर हार्मन बाकर हे जर्मनीमध्ये 1924 मध्ये जन्मलेले होते.पुणे विद्यापीठात धर्मगुरू चे शिक्षण घेण्यासाठी ते भारतामध्ये आले. याकाळात गोरगरिबांच्या अडचणी समजून घेत त्यांची जीवनभर सेवा करण्याचा निर्धार त्यांनी केला. या अंतर्गत त्यांनी अहमदनगर या दुष्काळी जिल्ह्याची निवड करून त्यात संगमनेर तालुका निवडला. श्रीरामपूर येथे टेक्निकल स्कूल सुरू केले. मात्र दुष्काळ निवारण्यासाठी जलसंधारण अत्यंत महत्त्वाचे असून ही लोकचळवळ व्हावी यासाठी त्यांनी संगमनेर तालुक्यात दरेवाडी, मेंढवण येथे इंडो-जर्मन च्या माध्यमातून पाणलोटाचे मोठे काम उभारले .

14 भाषा अवगत असलेले फादर हरमन बाकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कामाची दखल घेत जर्मन सरकारने त्यांना सर्वोच्च 'ऑर्डर ऑफ मेरीट' या पुरस्काराने मेंढवण येऊन त्यांना सन्मानित केले .याचबरोबर महाराष्ट्र सरकारने त्यांना कृषिभूषण पुरस्काराने गौरवले होते.

गोरगरीब मध्ये देऊ पाहणारा देव माणूस हरपला-- महसूलमंत्री

फादर बाकर हे जर्मनीचे असले तरी सहा दशके महाराष्ट्रात राहून ते पूर्ण महाराष्ट्रीयन झाले होते. 14 भाषा अवगत असणाऱ्या या माणसाने कायम गोरगरिबांना मध्येच आपले जीवन व्यतीत केले. सामान्यांचे जीवन उंचावण्यासाठी माथा ते पायथा ही जलसंधारणाची मोठी योजना त्यांनी राबविली. जलसंधारण ही लोकचळवळ होण्यामध्ये त्यांचा मोठा पुढाकार राहिला त्यांचे निधनाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील जल अभ्यासाचा व जलसंधारणाचा महामेरू हरपला असल्याची भावना महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे..

Updated : 15 Sept 2021 8:36 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top