कोविड योद्धांंचे आमरण उपोषण; प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष
टीम मॅक्स महाराष्ट्र | 8 Sept 2021 5:06 PM IST
X
X
कोरोना काळात कोविड रुग्णालयात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अमरावती जिल्ह्यातील बेरोजगार डॉक्टर, परिचारिका सह इतर कर्मचाऱ्यांनी सेवा दिली,मात्र कोरोनाची दुसरी लाट संपताच कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या१३८६ कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले, त्यांनी अविरत दीड वर्ष कोरोनामध्ये सेवा दिली. मात्र अचानक कामावरून काढल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमार आली, त्यामुळे येणाऱ्या शासकीय पद भरतीत समाविष्ट करण्यात यावे व आता रुग्णालयात समाविष्ट यावे मागणीसाठी अमरावतीच्या इर्विन चौकात कोविड योद्धा कर्मचारी आमरण उपोषणास बसले आहेत,गेल्या तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही,तर आज दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Updated : 8 Sept 2021 5:06 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire