शिवसेनेच्या भाजीबाजार हलविण्याच्या मागणीला शेतकऱ्यांचा विरोध
X
वर्धा : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत भाजी बाजार आहे त्याच ठिकाणी ठेवावा अशी मागणी केली आणि कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व सचिवांना समस्या सांगून सविस्तर चर्चा केली. सचिवांशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी धडकले, व उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्यासमोर आपल्या समस्या व मागणी सांगत तोडगा काढण्यासाठी विनंती केली.
कालच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भाजी बाजार कोविडच्या आधी होता तसा भरविण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन दिले. मात्र, आज शिवसेनेच्या या मागणीला पूर्णपणे विरोध दर्शवत शेतकऱ्यांनी भाजीबाजार आहे तिथेच ठेवण्याची मागणी केली. काल बाजार समितीच्या सभापतींनी भाजीबाजार हटविण्याबाबत आदेश काढला तो आदेश शेतकऱ्यांना मान्य नाही. अडते व व्यापारी सर्व शेतकरी सर्वांनी संताप व्यक्त करत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना आपली समस्या सांगितल्या, सभापतींनी सविस्तर चर्चा केली.यावेळी शेतकऱ्यांनी भाजी बाजार न हटवण्याची मागणी रेटून धरली.यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.