Home > News Update > "काका माझा भाचा तळमळून गेला", ऊस बिल थकलेल्या शेतकऱ्याचा खासदार संजय काकांपुढे संताप

"काका माझा भाचा तळमळून गेला", ऊस बिल थकलेल्या शेतकऱ्याचा खासदार संजय काकांपुढे संताप

भाजप खासदार संजय पाटील यांनी थकीत ऊस बीलाचे चेक बाऊन्स झाले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक होत खासदार संजय पाटील यांच्या घरावर मोर्चा काढला. तर संजय पाटील यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्याला गहिवरून आले. शेतकरी खासदार संजय पाटील यांना म्हणाला, काका माझा भाचा तळमळून मेला ओ हे बरोबर नाही. वेळेवर पैसे मिळाले नाहीत. म्हणून माझा भाचा मेला, असे म्हणत संताप व्यक्त केला.

काका माझा भाचा तळमळून गेला, ऊस बिल थकलेल्या शेतकऱ्याचा खासदार संजय काकांपुढे संताप
X

भाजप खासदार संजय पाटील यांच्या मालकीच्या असलेल्या नागेवाडी व तासगाव कारखान्याचे बील गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना मिळाले नाही. तर शेतकऱ्यांना दिलेले चेक बाऊन्स झाले त्यावरून शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय पाटील यांच्या तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील घरावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी संजय पाटील मोर्चास्थळी आले. तर शेतकऱ्यांनी गहिवरून संजय पाटील यांच्यासमोर संताप व्यक्त केला.

संजय पाटील यांनी दिलेले चेक बाऊन्स झाल्याने शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय पाटील यांच्या घरावर मोर्चा काढला. या मोर्चेकरी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी संजय पाटील आले होते. त्यावेळी शेतकरी म्हणाला की, मी तुमचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, माझा भाचा तळमळून मेला. हे बरोबर नाही. वेळेवर पैसे मिळाले नाहीत म्हणून माझा भाचा गेला.

यावेळी संजय पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देताना सांगितले की, येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत सर्व थकीत बीले तुमच्या खात्यावर वर्ग करतो. मात्र शेतकऱ्यांनी संजय पाटील यांचे म्हणणे मान्य केले नाही. तर आता 2 हजार 500 रुपये नाही तर 2 हजार 850 रुपये घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे सांगितले. त्याबरोबरच तासगाव तहसील कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचेही शेतकऱ्यांनी म्हटले.

Updated : 21 Jan 2022 5:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top