गाझीपूर आंदोलन: शेतकऱ्यांना आंदोलन स्थळ सोडण्याचे पोलिसांचे आदेश...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 28 Jan 2021 8:28 PM IST
X
X
दिल्ली शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता सरकारने कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सरकारने गाझीपूर सीमेवर कलम 144 लागू केलं आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस तेनात केलं आहे.
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने आंदोलन स्थळ खाली करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. कोणालाही अटक होणार नाही, इथं गोळी चालवली गेली तर पोलीस प्रशासन जबाबदार असेल. असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. सध्या गाझीपूर बॉर्डरवर शेतकरी नेत्यांची बैठक सुरु आहे. गाजीपुर बॉर्डर ला दोन्ही बाजूने बंद केलं आहे. ट्रॅफिक पोलिसांनी लोकांना गाजीपुर ला जाऊ नका असा सल्ला दिला आहे.
Updated : 28 Jan 2021 8:31 PM IST
Tags: Farmers
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire