तर लढा व्यापक होईल : डॉ.ढवळे
X
राज्यभरातून हजारो आंदोलक वाहनांमधून घटनदेवी मंदिर परिसरात जमा झाले. मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला होता. इगतपुरी वरून निघालेला वाहन मार्च २४ तारखेला आझाद मैदानावर सायंकाळी पोहचून महामुक्काम मोर्चा होईल. त्यांनंतर २५ तारखेपासून मोर्चा राजभवनावर निघून २६ जानेवारीपर्यंत चालेल. तीन कृषी विरोधी व चार कामगार विरोधी कायदे, प्रस्तावित वीज बिल मागे घेण्यासाठी राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे. यामध्ये ५० हजाराहून अधिक आंदोलक सहभागी होतील व लढा व्यापक करतील. जर सरकारने याची दखल घेतली नाही. तर संपूर्ण राज्यभरात जिल्हानिहाय आंदोलन छेडण्यात येईल,अशी माहिती डॉ.ढवळे यांनी दिली.
यावेळी डॉ. ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी. एल. कराड, राज्य सचिव डॉ. अजित नवले, सुनील मालुसरे, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या मरीयम ढवळे, 'डीवायएफ'च्या नेत्या प्रीती शेखर आदी उपस्थित आहेत.