शेतकरी तुमचा ऋणी राहील, गोदी मीडियाच्या वातावरणात शेतकऱ्याने पुसला पत्रकाराचा घाम
X
सध्या उत्तर प्रदेशमधल्या मुज्जफरनगर येथे किसान मोर्चाकडून आयोजित करण्यात आलेल्या महापंचायत सभेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. शेतकरी विरुद्ध मोदी सरकार असं चित्र रंगताना शेतकरी आंदोलनात आलेल्या गोदी मीडियाला शेतकरी चक्क पळवून लावत आहे. या सगळ्या वातावरणात शेतकऱ्यांना खऱ्या पत्रकारितेची आणि पत्रकारांची जाणीव असल्याचं देखील चित्रही पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर पत्रकार अजित अंजुम यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पत्रकार अजित अंजुम रिपोर्टिंग करत असताना शेतकरी बांधव त्यांच्या कपाळावरील घाम रुमालाने पुसत असताना म्हणतात की, आम्ही शेतकरी तुमचे ऋणी आहोत. या शेतकऱ्यांच्या पत्रकाराविषयी असलेल्या भावना या व्हिडिओतून पाहायला मिळतायेत...
सर, ये इज़्ज़त है… कमाई जाती है! आपने कमायी है। @ajitanjum 🙏 https://t.co/WVN9xir5ov
— Prashant Kumar (@scribe_prashant) September 5, 2021
पत्रकार अजित अंजुम- 'क्या ओ सरकार इस मजबूत उपस्थिती महापंचायत की ताकद का' असं म्हणतं असतानाच शेतकरी त्यांच्या कपाळावरचा घाम रुमालाने पुसत आहे. यावेळी शेतकरी म्हणतात रात्रंदिवस शेतकऱ्यांचा आवाज जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहचवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आहे.
शेतकरी-
इतनी खरतनाक सरकार होते हुए भी अपने किसी की परवाह नहीं की, ट्रोलिओ में जाकर बरसात में जाके, लोगो के खेतो मे जाके आपने लोगोंकी आवाज उठाई है. हम आपके ऋणी रहेंगे, किसान आपका ऋणी रहेगा... अशा शब्दात अजित अंजुम यांना सन्मान शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान गेल्यावर्षी २२ डिसेंबरला २०२० रोजी अजित अंजुम यांना शेतकऱ्यांनी मारहाण केल्याची अफवा सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात केली जात होती. त्यावर अनेक फॅक्ट चेकच्या बातम्याही झाल्या. खुद्द अजित अंजुम यांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. परंतु गेल्यावर्षी गाजलेल्या अफवेवर यंदाचा हा व्हिडिओ सडेतोड उत्तर असल्याचं पाहायला मिळत आहे.
खरंतर या व्हिडिओमधून मातीशी नाळ जोडणारी पत्रकारिता अजूनही जिवंत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा त्यांचा व्हिडिओ अनेक नेटिझन्सने शेअर करत पत्रकारितेचा सन्मान केला आहे.
साक्षी जोशी हा व्हिडिओ ट्विटवर शेअर करत म्हणतात की, हे खरं सोनं आहे. अजित अंजुम रिपोर्टिंग करताना शेतकऱ्याने रुमालने त्यांच्या कपाळवरील घाम पुसला असून हा भावनिक करणारा क्षण आहे. हा क्षण तुम्ही कमावला आहे.
This is PURE GOLD ❤️
— Sakshi Joshi (@sakshijoshii) September 5, 2021
ये आज #MuzaffarnagarPanchayat में हुआ@ajitanjum जी को पसीने में रिपोर्टिंग करते देख पास खड़े किसान से रहा नहीं गया
अपना रुमाल निकाला और….. भावुक करने वाला पल
इतना प्यार और इज़्ज़त
इसे आपने अपनी मेहनत से कमाया है #मुजफ्फरनगर_किसान_पंचायत pic.twitter.com/eqVNsi6Yxg
प्रशांत कुमार हा व्हिडिओ शेअर करत म्हणतात की, सर ही इज्जत आहे तुम्ही कमावली आहे.
सर, ये इज़्ज़त है… कमाई जाती है! आपने कमायी है। @ajitanjum 🙏 https://t.co/WVN9xir5ov
— Prashant Kumar (@scribe_prashant) September 5, 2021
कोण आहेत पत्रकार अजित अंजुम?
अजित अंजुम वरिष्ठ पत्रकार, आणि लेखक आहे. त्यांनी न्यूज २४ आणि इंडिया टीव्ही समाचार चॅनल्सचे संपादक ही राहिले आहेत. स्टार न्यूज मध्ये असताना त्यांनी सनसनी, रेड अलर्ट, आणि पोल खोल कार्यक्रम केले आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आतापर्यंत राहिलेलं आहे. बिहार मध्ये केलेल्या पूरपरिस्थितीच्या कव्हरेजसाठी त्यांना २०१० ला रामनाथ गोयंका पुरस्कार ही मिळालेला आहे. सध्या ते गेल्या १० महिन्यांपासून ऐतिहासिक अशा शेतकरी आंदोलनाचे कव्हरेज ग्राऊंड लेव्हलवर करत आहे. त्यांची पत्रकारिता पाहता शेतकऱ्यांनी त्यांचा शब्दांनी केलेला सन्मान सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.