राहुल गांधींच्या मुक्कामासाठी शेतकऱ्याने पीक कापून जमीन दिली.
राहुल गांधी यांची यात्रा आकोला जिल्ह्यात १७ नोव्हेंबरला येणार आहे, असे समजताच स्थानिक शेतकऱ्याने आठ एकर पीक कापून राहुल गांधी यांच्या मुक्कामासाठी जमीन दिली. तसेच कार्यकर्ते यांच्या भोजनाची देखील व्यवस्था केली.
X
भारत जोडो यात्रा सध्या हिंगोली जिल्ह्यात असून १७ नोव्हेंबरला हि यात्रा अकोेला जिल्ह्यात येणार आहे. राहुल गांधींची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपवण्यात आल्याने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली. अकोेला जिल्ह्यातील बाळापूर येथे १७ आणि १८ तारखेला राहुल गांधी यांचा मुक्काम असणार आहे. राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते यांच्या भोजनाची सोय आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी बाळासाहेब थोरात, आणि यशोमती ठाकुर जागेची शोध घेत होते. स्थानिक शेतकरी होदे गुरुजी यांना हि गोष्ट कळताच त्यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.
आपल्या शेतातील आठ एकर जमिनीतील पीक कापून राहुल गांधी यांच्या मुक्कामाची आणि कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. काँग्रेसचे सरचिटणीस संजय दुबे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली, होदे गुरुजी यांची बाळापूर तालुक्यातील बाद फाटा येथे आठ एकर शेतजमीन असून त्यांनी त्यांच्या जमीनीतील पीक कापून भारत जोडो यात्रेतील कार्यकर्ते आणि राहुल गांधी यांच्या दोन दिवसीय मुक्कामासाठी जमीन देण्याची तयारी दाखवली. काँग्रेस नेत्यांनी होदे गुरुजी यांचे आभार हि मानले. तसेच होदे गुरुजी यांनी देखील आपल मत व्यक्त असून ते म्हणतात कि "काँग्रेसचा एवढा मोठा नेता येणार असून आम्हाला या गोष्टीचा आनंद होत आहे. त्यांच्या मुक्कामासाठी जमीन देणे मी माझे भाग्य समजतो." अशी भावना त्यांनी व्यक्त केली.