परमबीर सिंह यांना धक्का, खंडणीचे प्रकरण CIDकडे
X
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना आता आणखी धक्का बसला आहे. परमबीर सिंह आणि इतर ८ जणांविरोधात दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा CIDकडे वर्ग करण्यात आला आहे. मरीन ड्राईव् पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. आता हे प्रकरण सीआयडीकडे देण्यात आले आहे.
परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना आपल्या एका बिल्डर मित्राच्या मदतीने त्यांनी कोट्यवधींची खंडणी मागितल्याचा आरोप एका बिल्डरने केला आहे. एवढेच नाही तर परमबीर सिंह यांच्या जवळीकीमुळे संजय पुनमिया याने आपल्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करुन आपल्याला तुरुंगात टाकले आणि खंडणी उकळली असाही आरोप या बिल्डरने केला आहे. परमबीर सिंह मुंबईचे पोलीस आयुक्त झाल्यानंतर देखील आपल्याला खंडणीसाठी इतर पोलिसांच्या माध्यमातून त्रास दिला गेला आणि लाखो रुपये उकळण्यात आले असा आरोप तक्ररदाराने FIRमध्ये केला आहे.
परमबीर सिंह यांच्याविरोधात ठाण्यात इतरही काही जणांनी खंडणीसाठी धमकी दिल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यावर आता काय कारवाई होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.