शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ
X
पुणे - पूर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती योजना अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी करण्यात येणाऱ्या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस 7 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. पुणे शहर व जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते. या परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केले जाते.
ही परीक्षा 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून घेतले जात आहेत. अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2023 या तारखेपर्यंत मुदत होती. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसायचे आहे मात्र मुदत संपल्याने अर्ज करता येत नसल्यामुळे अर्ज करण्याच्या मदतीमुळे करण्यात आले असून येत्या सात डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज स्वीकारताना विद्यार्थ्यांकडून नियमित शुल्कासह हे अर्ज स्वीकारले जातील.
याशिवाय विलंबित शुल्कासह आठ डिसेंबर ते 15 डिसेंबर आणि अति विलंबित शुल्कासह 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर व अतिविशेष शुल्कासह 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे.