Home > News Update > निवृत्तीधारकांना २५ लाखांपर्यत करामधून सूट...

निवृत्तीधारकांना २५ लाखांपर्यत करामधून सूट...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग पाचवा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. यावेळी त्यांनी बिगर सरकारी कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिली. यापुढे बिगर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी आपल्या उर्वरित सुट्ट्या इनकॅश करता येणार आहेत.

निवृत्तीधारकांना २५ लाखांपर्यत करामधून सूट...
X

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज आपला सलग पाचवा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. यावेळी त्यांनी विविध घोषणा केल्या, त्यामध्ये त्यांनी बिगर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी सुट्ट्यांच्या मिळणाऱ्या रकमेत २५ लाखांपर्यंत करामधून सूट देण्यात आल्याची घोषणा केली केली. त्यामुळे बिगर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशात ४२.७ टक्के करांचे दर आहेत. सरचार्ज रेट ३७ टक्क्यांवरुन २५ टक्क्यांवर आणण्याची घोषणा सीतारमण यांनी सभागृहात केली. यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे देशातील करांचे दर ३९ टक्क्यांपर्यत खाली येण्याची शक्यता आहे. १५.५ लाख किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक पगार असणाऱ्या व्यक्तीला ५२ हजार रुपयांचा यातून फायदा होणार आहे.

नव्या कर श्रेणीत २.५ लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. आता या स्लॅब्जची संख्या ५ पर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यानुसार...

३ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांन कोणताही कर लागू होणार नाही.

३ ते ६ लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना ५ टक्के कर द्यावा लागणार आहे.

६ ते ९ लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना १० टक्के कर द्यावा लागणार आहे.

९ ते १२ लाख रुपयांपर्यत उत्पन्न असणाऱ्यांना १५ टक्के कर भरावा लागणार आहे.

१२ ते १५ लाख रुपयांपर्यत उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्के कर भरावा लागणार आहे.

१५ लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना यापुढे ३० टक्के कराचा भरणा करावा लागणार आहे.

सध्या ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेले नागरिक कोणताही टॅक्स भरत नाहीत. ही मर्यादा ७ लाखांपर्यंत वाढवण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली आहे. नव्या कररचनेचा स्वीकार करणाऱ्यांना ही पद्धती लागू होणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी यावेळी सांगितले.

या वर्षी ६.५ हजार कोटींचे रिटर्न पूर्ण करण्यात आले आहे. तर ४५ टक्के रिटर्न्स फक्त २४ तासांत पूर्ण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत दिली.

Updated : 1 Feb 2023 2:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top