Home > News Update > आरबीआयला जगातील इतर देशांप्रमाणे व्याजदर वाढवावे लागतील- रघुराम राजन माजी RBIगव्हर्नर

आरबीआयला जगातील इतर देशांप्रमाणे व्याजदर वाढवावे लागतील- रघुराम राजन माजी RBIगव्हर्नर

आरबीआयला जगातील इतर देशांप्रमाणे व्याजदर वाढवावे लागतील- रघुराम राजन माजी RBIगव्हर्नर
X

देशात सध्या महागाईचं संकट ओढावलं आहे.महागाईने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे.त्यातच(RBI) भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी याबद्दल महत्वाचं विधान केलेलं आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर (Governer)यांनी सोमवारी सांगितले की.महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बॅंकेला व्याजदर दर वाढवावे लागतील आणि दरवाढीकडे राजकारणी आणि नोकरदारांनी देशविरोधी पाऊल म्हणून पाहू नये.आपल्या परखड मतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजन यांच्या मते, महागाई(inflation) विरोधातील लढाई कधीच संपत नाही,हे लक्षात ठेवायला हवे.

एका सोशल नेटवर्किंग साईटवर त्यांनी याबद्दल वक्तव्य केले आहे की, भारतात महागाई वाढत आहे.काही क्षणी आरबीआयला जगातील इतर देशांप्रमाणे व्याजदर वाढवावे लागतील,अन्नधान्याच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यामुळे मार्चमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर १७ महिन्यांच्या उच्चांकी ६.१५ टक्क्यांवर पोहचला.हे आरबीआयच्या समाधान पातळीपेक्षा जास्त आहे.दुसरीकडे कच्च्या तेल आणि वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे घाऊक महागाईचा दर मार्चमध्ये १४.५५ टक्क्यांच्या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहचला आहे.

त्याचप्रमाणे राजकारणी आणि नोकरदारांनी हे समजून घेतले पाहिजे की दर वाढ करणे ही देशविरोधी कृती नाही,ज्यामुळे परदेशी गुंतवणूकीदारांना फायदा होईल.त्याऐवजी , आर्थिक स्थैऱ्यासाठी उचललेले हे पाऊल आहे,ज्याचा देशाला सर्वाधिक फायदा होतो. असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

Updated : 26 April 2022 2:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top