Home > News Update > हर्षवर्धन जाधवांच्या अडचणीत पुन्हा वाढ;सरकारी पक्षाच्या अर्जावर खंडपीठाची नोटीस
हर्षवर्धन जाधवांच्या अडचणीत पुन्हा वाढ;सरकारी पक्षाच्या अर्जावर खंडपीठाची नोटीस
माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे. २०११ मध्ये पोलीसांना मारहाण केल्या प्रकरणात दिलेली जामीन रद्द करण्याबाबत नोटीस पाठवली आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 23 Feb 2021 10:22 AM IST
X
X
२०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ताफ्यात वाहन आडवे आणून पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना एक वर्षाची शिक्षा झाली होती. पुन्हा असे कृत्य न करण्याच्या अटीवर न्यायालयाने त्या वेळी त्यांना जामीन दिला होता.
मात्र, जाधव यांच्याकडून पुन्हा गुन्हेगारी कृत्ये घडली आहेत. त्याआधारे त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी करणारा अर्ज मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी सोमवारी औरंगाबाद खंडपीठात दाखल केला. त्यावर न्या. मंगेश पाटील यांनी जाधव यांना नोटीस बजावून 'जामीन रद्द का करण्यात येऊ नये?' अशी विचारणा केली आहे. तर याप्रकरणी पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे.
Updated : 23 Feb 2021 10:22 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire