माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन
कोरोना महामारीचा प्रकोप देशभर वाढत असताना मृत्यू दर देखील वाढला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते.
X
उत्तर प्रदेशातील मोठे नेते असणाऱ्या अजित सिंह यांची फुफ्फुसांचा संसर्ग झाल्याने प्रकृती ढासळली होती. यानंतर त्यांना गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान २० एप्रिल रोजी त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारादम्यान गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मंगळवारी रात्री प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. गुरुग्रामच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, फुफ्फुसात संक्रमण पोहचल्यानं त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. मात्री, त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि उपचारा दरम्यान गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र चौधरी अजित सिंह उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारघाचं प्रतिनिधित्व करत सात वेळा संसदेत दाखल झाले होते. त्यांनी केंद्रात नागरिक उड्डाण मंत्री पदाची जबाबदारीही हाताळली होती. केंद्रामध्ये युपीए सत्तेत असताना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अजित सिंह यांची राजकीय भूमिका चर्चेची ठरली होती.