आता प्रत्येक गरीब विद्यार्थी होणार अधिकारी
X
आज प्रत्येक विद्यार्थी अधिकारी होण्याची स्वप्न पाहत असतो. मात्र त्यापैकी काहीच जणांचे स्वप्न पूर्ण होते. पण आता सर्वांचे स्वपूर्ण व्हावे या उद्देशाने यवतमाळच्या मयूरने सरळ आणि सुलभ भाषेत एक अॅप तयार केले आहे. हे अॅप विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करणार आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न उत्तरासांसाठी या अॅपची मदत होणार आहे.
राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आज अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. परंतु अपूरी माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने कठोर परिश्रम करून देखील ते आपले ध्येय गाठू शकत नाही. अशाच प्रत्येक सर्वसामान्य गरजू व गरीब कुटुंबातून अधिकारी निर्माण व्हावा, हाच उद्देश घेऊन यवतमाळच्या मयूर मोगरे या तरुणाने अतिशय सरळ आणि सोप्या भाषेत एक ॲप तयार केले आहे. ज्या माध्यमातून आता शेकडो स्पर्धा परीक्षार्थी आपले ध्येय गाठू शकणार आहेत. हे अॅप विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेतील प्रश्नांची उत्तरे सोप्या पद्धतीने समजवून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
मयूर मोगरे हा यवतमाळ येथे राहतो. मयुरने आपले शालेय व महाविद्यालय शिक्षण यवतमाळ येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर यवतमाळच्या जगदंबा इंजिनीयर कॉलेज मधून त्याने एम.ई. चे शिक्षण घेतले आणि तो पीएचडी करत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तो मार्गदर्शन करतो आहे. याशिवाय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असतानाच त्याने एमपीएससी, यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सुद्धा केले आहे. मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक उणीवा मयूरला जाणू लागल्या. त्या उणीवावर मात करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा अधिक सोप्या पद्धतीने देता याव्या यासाठी मयूरने एक अॅप तयार केले.
आज विद्यार्थी आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. याकरिता लाखो रुपये आपल्या शिकवणीवर खर्च करीत आहे. मात्र अभ्यास करण्याच्या पद्धती आणि योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने आज सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि प्रत्येक घरात अधिकारी घडावा हा उद्देश लक्षात घेऊन मयुरने एक ॲप तयार केले आहे. हे अॅप अतिशय सरळ आणि सोप्या भाषेत असल्याचे मयूरने सांगितले आहे.