Home > News Update > जळगाव जिल्ह्यात होणार शुगर बीटपासून इथेनॉलची निर्मिती

जळगाव जिल्ह्यात होणार शुगर बीटपासून इथेनॉलची निर्मिती

जळगावातील कृषी विकास प्रकल्पावर शुगर बीटपासून इथेनॉल उत्पादन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कृषीतज्ज्ञ वासुदेव तोताडे यांनी शुगर बीटची लागवड आणि इथेनॉल निर्मितीचे फायदे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

जळगाव जिल्ह्यात होणार शुगर बीटपासून इथेनॉलची निर्मिती
X

जळगावातील कृषी विकास प्रकल्पावर शुगर बीटपासून इथेनॉल उत्पादन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील मराठा मंगल कार्यालयामध्ये शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादादरम्यान कृषीतज्ज्ञ वासुदेव तोताडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

इथेनॉल निर्मिती प्रकल्पासाठी विशेष योजना

भारत हा तेल आयात करणारा जगभरातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर भारताच्या बजेटमधील सर्वात जास्त पैसा हा तेल आयातीवर खर्च होतो. त्यामुळे भारतातील पैसा भारतातच राहावा यासाठी भारत सरकारने आत्मनिर्भर योजने अंतर्गत इथेनॉल निर्मिती प्रकल्प भारतात उभे करण्यासाठी 2023 पर्यंत 7 हजार 500 रु गुंतवणूक करण्याची योजना सुरू केली आहे. जर भविष्यात ही योजना सफल झाली तर विदेशातून आयात होणारे तेल 20 टक्क्याने कमी होऊ शकते. तर या इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचाही आर्थिक फायदा होऊ शकतो.

5 महिन्यात एकरी 20 ते 25 टन उत्पन्न

अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार शुगर बीटपासून इथेनॉलची निर्मितीचा प्रकल्प जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे उभारण्यात येणार आहे. शुगर बीट पिकाचे पाच महिन्यात 20 ते 25 टन प्रतिएकरी उत्पन्न मिळू शकते. दरम्यान या पिकाची लागवड कशी करायची?, उत्पादन वाढीसाठी काय काय उपाययोजना करायला हव्या? सोबतच शुगर बीटपासून इथेनॉल निर्मितीचे फायदे याबाबत शेतकऱ्यांना कृषीतज्ज्ञ वासुदेव तोताडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Updated : 24 July 2021 8:01 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top