आजपासून मुंबईतील प्रवेश महागणार
X
गेल्या काही दिवसांपासून मुंबई वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. मात्र आता याच मुंबईत प्रवेश करणे महाग होणार आहे.
रविवारपासून मुंबईत प्रवेश करणे महाग होणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने माहिती दिली आहे.
रविवारपासून मुंबईत प्रवेश करण्यासाठी 5 ते 30 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टोल दरांमध्ये वाढ केली आहे. हे दर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत लागू असणार आहेत.
आतापर्यंत मुंबईत प्रवेश करण्यासाठी चारचाकी गाडीला 40 रुपये, मिनी बसला 65 रुपये, ट्रकला 130 रुपये तर अवजड वाहनांना 160 रुपये टोल द्यावा लागत होता. मात्र आता 1 ऑक्टोबरपासून यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव दरानुसार चारचाकी गाडीला 45 रुपये, मिनी बसला 75 रुपये, ट्रकला 150 रुपये तर अवजड़ वाहनांना 190 रुपये इतका टोल द्यावा लागणार आहे. मात्र या टोलच्या वाढीव दरावरून मनसेने मुलुंड टोलनाक्यावर आंदोलन केले होते.
मनसेने शनिवारी सकाळी मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील टोलनाक्यावर आंदोलन केले. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले की, सरकारने 1999 चे एग्रीमेंट दाखवले आहे. त्यानुसार मुलुंड टोलनाका पाच वर्षांपुर्वीच बंद होणे आवश्यक होते. मात्र अजूनही तसं झालं नाही, असं म्हणत अविनाश जाधव यांनी सरकारवर टीका केली.