गरोदर महिला व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी इंग्लंडची टीम भारतात, आरोग्यसेवा विशेषज्ज्ञ कौस्तुभ बुटाला यांची माहिती
X
भारतातील गर्भवती महिला आणि अर्भकांच्या मृत्यूमध्ये घट कशी होईल? याचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंड वरून पाच डॉक्टरांची टीम सध्या पुण्यामध्ये आली आहे. UK च्या royal college of pediatrics या संस्थेचे हे डॉक्टर आहेत. Dr. Arvind Shah व Dr. Sebastian यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम पुणे, सातारा, सांगली सिव्हील हॉस्पिटल्स आणि ससून रुग्णालयातील रुग्णांचा अभ्यास करणार आहे. जगभरातील विविध उपचार पद्धतींचा अभ्यास करून ते आपला संशोधन अहवाल प्रसिद्ध करणार असल्याचं आरोग्य सेवा विशेषज्ञ कौस्तुभ बुटाला यांनी काल पुणे इथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
डॉक्टरांची टीम भारतात नक्की काय करणार?
अरविंद शहा हे मूळचे सांगली या ठिकाणचे आहेत. डॉक्टर अरविंद शहा यांनी गरोदर महिलांचे मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. या हेतून त्यांनी काम करण्याचे ठरवलं. जे विकसित देश आहेत. त्या देशांमध्ये जे गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण त्याचबरोबर बालमृत्यूचे प्रमाण आहे. अगदी त्याप्रमाणेच जे विकसनशील देश आहेत त्या देशांमध्ये देखील हे प्रमाण कमी झालं पाहिजे, म्हणून त्यांनी या कामाला सुरुवात केली. आणि त्यानंतर UK royal college of pediatrics व डॉ. अरविंद शाह यांनी भारतात खास करून पुणे, सातारा, सांगली सिविल हॉस्पिटल्स आणि ससून रुग्णालयातील रुग्णांचा अभ्यास करण्याचे ठरवले. आता डॉ. अरविंद शाह आणि डॉ. सेबेस्टियन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची ही टीम पुणे, सातारा, सांगली सिव्हिल हॉस्पिटल्स आणि ससून रुग्णालयातील रुग्णांचा अभ्यास करणार आहे. जगभरातील विविध उपचार पद्धतींचा अभ्यास करून ते आपला संशोधन अहवाल प्रसिद्ध करणार आहेत.
रॉयल कॉलेज ऑफ चाईल्ड हेल्थ संस्था नक्की काय काम करते?
आज UK येथून पाच डॉक्टरांची टीम पुण्यात पोहोचली असून ही टीम Dr. Arvind Shah व Dr. Sebastian यांच्या नेतृत्वाखाली, रॉयल कॉलेज ऑफ पेडिएट्रिक अँड चाइल्ड हेल्थ या संस्थेतून आलेली आहे. रॉयल कॉलेज ऑफ चाईल्ड हेल्थ ही युके गव्हर्मेंट ची संस्था आहे. ही संस्था नॅशनल हेल्थ सिस्टम प्रोग्राम अंतर्गत कार्यरत आहे. थोडक्यात जे ग्रेट ब्रिटनचे आरोग्य खाते आहे. त्यासाठी ही संस्था काम करते. ही संस्था गर्भवती महिला व बालकांसाठी एक असा अभ्यास करू इच्छिते ज्या ज्यामुळे पाकिस्तान, नेपाळ, भारत व ग्रेट ब्रिटन म्हणजेच युनायटेड किंगडम या सर्व देशांच्या ज्या चांगल्या प्रकारच्या उपचार पद्धती आहेत. आपण ज्याला बेस्ट प्रॅक्टिस म्हणतो, त्या सर्व एकत्रित करून त्याचा अभ्यास करून त्याचा संशोधन अहवाल प्रसिद्ध करणार आहे. ज्यामुळे गर्भवती महिला व बालकांच्या मृत्यू दरात घट होईल. तसेच ते आरोग्यदायी कसे राहतील? याच्यावरती प्रकाश टाकला जाईल. हा अभ्यास दौरा आयोजित करण्यासाठी आरोग्य सेवा विशेषज्ञ कौस्तुभ बुटाला यांनी अथक परिश्रम घेत महाराष्ट्र शासनाची रॉयल कॉलेज ऑफ यांचा संवाद साधून त्यांना सर्व परवानगी मिळवण्यास मदत केली.
पाच डॉक्टरांची टीम आज पासून 11 दिवस हा अभ्यास करणार...
पुना सिविल हॉस्पिटल, सातारा सिव्हिल हॉस्पिटल, सांगली सिविल हॉस्पिटल तसेच ससून रुग्णालयात ही संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटची संवाद साधून त्यांच्या बाबतची माहिती एकत्र करणार आहे. डॉक्टर अरविंद शहा हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत ते डॉक्टर्स ऑफ इंडियन ओरिजिन या 6 भारतीय डॉक्टर च्या संस्थेचे ट्रेझरर व खजिनदार आहेत. त्यांच्या संस्थेने covid-19 च्या कालावधीत जवळजवळ 200 मिनी व्हेंटिलेटर जे ग्रामीण रुग्णालयातले डॉक्टरशी सहजपणे वापरू शकतील, असे लंडनून महाराष्ट्रात पाठवले. त्यावेळी हे कार्य महाराष्ट्रात सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री कार्यालयातून कौस्तुभ बुटाला यांच्यावर होती. या कामादरम्यान्य कौस्तुभ बुटाला व डॉ. अरविंद शहा व मुकुल माधव फाउंडेशनच्या चेअरमन रितू छाब्रिया यांचा एकमेकांशी संपर्क आला. रितू छाब्रिया यांनी आत्तापर्यंत कोटयावधी रुपये सी.एस. आर म्हणून खर्च करून महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था व अनेक शासकीय रुग्णालयात चांगल्या सोईसुविधा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुकुल माधव फाउंडेशनने तर बालकांसाठी एक पूर्ण कक्षच ससून रुग्णालयात उघडला आहे.
आता पाच डॉक्टरांची टीम आज पासून 11 दिवस हा अभ्यास चालणार आहे, त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅलेस्टाईन मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर मेरी या सुद्धा या अभ्यासत सहभागी झाल्या आहेत. रॉयल कॉलेज या संस्थेने उपमुख्यमंत्री कार्यालयात कोविड 19 कक्ष संभाळणारे श्री कौस्तुभ बुटाला यांनी जी हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यासाठी काल आयोजित पत्रकार परिषदेत मान्यवरांनी त्यांचे विशेष आभार मानले तसेच रितू छाब्रिया व मुकुल माधव फाउंडेशन यांनी हा अभ्यास चालू करण्यासाठी विविध ठिकाणी सहकार्याला केले आहे त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले..