भारताकडून इंग्लंडचा १ डाव, ६४ धावांनी पराभव; गिल-रोहितचे शतक, अश्विनकडून ९ विकेट
X
भारताकडून इंग्लडलचा धर्मशाला कसोटीत एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. यासोबतच ५ सामन्यांची कसोटी मालिका ४-१ अशी जिंकली. एचपीसीए स्टेडीयमवप गुरूवारी इंग्लंडनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात इंग्लडचा डाव २१८ धावांत आटोपला आणि टीम इंडियाने ४७७ धावा केल्या. भारताला दुसऱ्या डावात २५९ धावांचा आघाडी मिळाली, जी इंग्लंडच्या टीमला गाठता आली नाही. अशा पध्दतीने संघाला एक डाव आणि ६४ धावांनी पराभव स्विकारावा लागला.
घरच्या मैदानावर गेल्या १२ वर्षात भारताचा हा सलग १७ वा मालिका विजय आहे. मायदेशात सलग सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे. मायदेशात सलग १० मालिका जिंकून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.
२०१२ मध्ये भारताला शेवटेचे घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर इंग्लंडने भारताचा २-१ असा पराभव केला. त्यानंतर टीम इंडीयाने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही आणि सलग १७ वेळा प्रतिस्पस्पर्धी संघाचा पराभव केला आहे