Home > News Update > Twitter Vs Meta : पहिल्याच दिवशी मेटा पाच कोटींच्या पुढे, मस्क भडकला

Twitter Vs Meta : पहिल्याच दिवशी मेटा पाच कोटींच्या पुढे, मस्क भडकला

Twitter Vs Meta : ट्विटरला टक्कर देण्यासाठी बाजारात मेटाने एन्ट्री केली आहे. मात्र मेटावर मस्क चांगलाच भडकला आहे. वाचा नेमकं कारण....

Twitter Vs Meta : पहिल्याच दिवशी मेटा पाच कोटींच्या पुढे, मस्क भडकला
X

Microblogging App असलेल्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी ट्विटरसारखेच वैशिष्ट्य असलेले मेटा थ्रेड्स हे App फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटा कंपनीने गुरुवारी लाँच केले. त्यानंतर वापरकर्त्यांनी अक्षरशः उड्या घेत मेटा थ्रेड्स App डाऊनलोड केले. त्यामुळे ट्विटरला टक्कर देणारा प्रतिस्पर्धी मार्केटमध्ये तयार झाला आहे. मात्र मेटा डाऊनलोड करण्यासाठी वापरकर्त्यांची झुंबड उडाल्यानंतर एलन मस्कने मेटाला चांगलंच सुनावलं आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये ट्विटरमध्ये वारंवार होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर मेटाने हे App लाँच केल्याने ट्विटरला पर्याय निर्माण झाला आहे. त्यामुळे मेटा लाँच झाल्यानंतर आतापर्यंत 5 कोटीपेक्षा जास्त वापकर्त्यांनी हे App डाऊनलोड केले आहे.

मात्र मेटाने ट्विटरची व्यापारी गोपनियता,IP Address तसेच बेकायदेशीरपणे डेटा स्क्रॅप केल्याचा आरोप करत एलन मस्क यांच्या वकिलांनी मार्क झुकेरबर्ग यांना नोटीस पाठवली आहे. तसेच खटला भरण्याची धमकी दिली आहे.

यानंतर या ट्वीटला रिप्लाय देत एलन मस्क यांनी स्पर्धा चांगली असते पण चिटिंग नाही, अशा शब्दात मेटाला सुनावलं आहे.


Updated : 7 July 2023 8:07 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top