Home > News Update > ट्रोल्सर्सचं आता खरं नाही... twitterवर कमवणार ४० पैसे भरावे लागणार ३ डॉलर

ट्रोल्सर्सचं आता खरं नाही... twitterवर कमवणार ४० पैसे भरावे लागणार ३ डॉलर

टेस्लाचे सीईओ एलन मस्क (elon musk) हे नेहमी चर्चेत राहणारं नाव आहे. मागील आठवड्यात मस्क यांनी ट्विटरमधील (twitter)शेअर्स विकत घेतल्याची घोषणा केली.त्यात एलॉनने ट्विटरवर आता नवीन घोषणा केली आहे.

ट्रोल्सर्सचं आता खरं नाही... twitterवर कमवणार ४० पैसे भरावे लागणार ३ डॉलर
X

आता ट्विटरवरच्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ब्लु टिकला आता पैसे मोजावे लागणार आहेत. अशी घोषणा एलॉन मस्कने आपल्या ट्विटरवरुन हि माहिती दिली आहे.ज्यांना ज्यांना ब्लु टिक किंवा ऑफिशिअल अकाउंट (official account)हवं असेल त्यांना महिन्याकाठी तीन डॉलर म्हणजेच २२७.७५ पैसे एवढे मोजावे लागणार आहे.

ज्यांच्याकडे ब्लु टिक असेल त्यांना ट्विट शेअर केल्यानंतर पहिल्या २० सेकंदात ट्विटमध्ये बदल करता येऊ शकणार आहेत.त्यांना तिकडे जहिरातींचा त्रास होणार नाही.असं देखील एलॉनने ट्विट केलं आहे.हा बदल पब्लिक फिगर आणि महत्वाचे अकाउंट पाहुन करणार असेही एलॉनने सांगितले आहे.

यामुळे बदलामुळे ट्विटरवर ट्रोलिंगचे प्रमाण कमी होऊ शकते.ट्रोलिंग गॅंगवर याचा चाप बसणार आहे.रुपया घसरत असल्यामुळे लोकांना मानसिक त्रास देणे आता महाग होणार आहे.ट्विटरने नवीन धंदा सुरु केलाय का, असेही लोकांनी ट्विट खाली कमेंट केली आहेत. विविध राजकीय पक्ष, सेलिब्रिटी आणि ट्विटर युजर्सने या धोरणांवर सकारात्मक आणि नकारात्मक अशा प्रकारच्या प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत.

Updated : 10 April 2022 8:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top