Home > News Update > वीज बिलाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये वाद नाही: बाळासाहेब थोरात

वीज बिलाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये वाद नाही: बाळासाहेब थोरात

लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिल माफीवरुन अद्याप निर्णय झाला नसला तरी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यावर आता प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरातांनी वक्तव्य करुन वीज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकार आणि कॉंग्रेसअंतर्गत वाद नाही असे स्पष्ट केले आहे.

वीज बिलाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये वाद नाही: बाळासाहेब थोरात
X

नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली, ती आमची चूक होती, असं अशोक चव्हाण म्हणाले होते." तर वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये विसंवाद आहे का याविषयी ते म्हणाले की, "वाढीव वीज बिलाबाबत बैठक झाली होती. त्या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी नितीन राऊतांनी केलेल्या घोषणेवर भाष्य केलं असावं, असं थोरात म्हणाले"

ते म्हणाले की, "कोरोनाच्या आधीही आमचं व्हिजन 100 युनिटच्या आत असलेल्यांना मदत करण्याबाबतचा विषय होता. कोरोनाच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलात मदत करण्याची आमची चर्चा होती. वीज बिलाबाबत एक बैठक झाली होती. त्या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना माहित नव्हतं. त्यामुळेच त्यांनी ते वक्तव्य केलं. काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे की सर्वांसमोर मोकळेपणाने बोलतो."

नव केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यातील दोष आम्ही दाखवत आहोत. हा कायदा जो केला त्यामध्ये कोणाला विश्वासात घेता केला आहे. हे कायदे नफोखोरांसाठीच बनवले आहेत. या कायद्याविरोधात सहकारी पक्ष आमच्यासोबत आहेत. त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. आम्ही त्यावर चर्चा करुन शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेणार आहेत,तसेच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांत मतमतांतर आहे, हे लोकशाहीला भूमिप्रेत नाही. अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.


Updated : 27 Nov 2020 5:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top