मनसेच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे लढणार माहीममधून
X
राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने आगामी निवडणुकांसाठी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत विविध जिल्ह्यातील उमेदवारांचा समावेश आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील नेत्यांची निवड करण्यात आली आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा आता संपणार आहे, कारण जाहीर झालेल्या मनसेच्या यादीत अमित ठाकरे यांचे 2 नंबरवर नाव असून त्यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. तसेच विद्यमान आमदार असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे.
यादीतून प्रमुख उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
प्रमोद पाटील - कल्याण ग्रामीण
अमित ठाकरे - माहीम
शिरीष सावंत - भांडूप पश्चिम
संदीप देशपांडे - वरळी
अविनाश जाधव - ठाणे शहर
संगिता चेंदवणकर - मुरबाड
किशोर शिंदे - कोथरूड
साईनाथ बाबर - हडपसर
मयूरेश वांजळे - खडकवासला
नयन कदम - मागाठने
यादीतील इतर उमेदवारांमध्ये कुणाल माईणकर (बोरीवली), राजेश वेरूणकर (दहिसर), भास्कर परब (दिंडोशी), संदेश देसाई (वर्सोवा) यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे.
या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या ताकदीचा पुरेपूर उपयोग करण्याचा प्रयत्न करणार असून, यामुळे राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यादीतील अन्य उमेदवारांमध्ये महेंद्र भानुशाली (चांदिवली), आदित्य दुरुगकर (नागपूर दक्षिण), आणि परशुराम इंगळे (सोलापूर शहर उत्तर) यांचा समावेश आहे.