Home > News Update > राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार?

राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार?

राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार?
X

महाराष्ट्रात राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसह राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. त्यामुळं राजीव सातव यांच्या जागेवर कॉंग्रेस कुणाला संधी देणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील रिक्त राज्यसभेच्या जागांवर ४ ऑक्टोबर ला पोटनिवडणूक होणार आहे. २२ सप्टेंबर ला अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.



राजीव सातव राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणून ओळखले जातात. ते २०१४ ला मोदी लाटेतही निवडून आले होते. २०१९ ला ते लोकसभा निवडणूक लढले नव्हते. त्यानंतर कॉंग्रेसने त्यांना राज्यसभेत पाठवले. मात्र, कोरोनाच्या लाटेत पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा १६ मे २०२१ मृत्यू झाला.

Updated : 9 Sept 2021 2:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top