Home > News Update > रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री, पोलिसांनी बजावली नोटीस

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री, पोलिसांनी बजावली नोटीस

रोशनी शिंदे यांना मारहाण प्रकरणी महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री, पोलिसांनी बजावली नोटीस
X

ठाणे (Thane) शहरात उध्दव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीनंतर वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फडतूस असा उल्लेख केला. त्यावरून राजकारण तापले असतानाच आता या प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री झाली आहे.

रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीची महिला आयोगाने (Women Commission) गंभीर दखल घेतली आहे. तसेच महिला आयोगाने मारहाण केल्याबद्दल नोटीस जारी केली आहे.

महिला आयोगाने जारी केल्लया नोटीसमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र महिला आयोग कार्यालय अधिनियम 1993 अंतर्गत कलम 10(1) (फ)(एक) व (दोन) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणेयाकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे. फेसबुक पोस्टवर कमेंट केल्याच्या रागातून रोशनी शिंदे यांना जमावाने मारहाण केल्याची घटना वृत्तवाहिन्यांवरून प्रसारीत झाली. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 कलम 12 (2) व (3) नुसार आपणांस निर्देश देण्यात येत आहेत की, 6 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता केलेल्या कारवाईच्या अहवालासह वरिष्ठ पोलिस निरिक्षक कासारवडवली पोलिस ठाणे यांनी स्वतः उपस्थित रहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यामुळे उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) शिंदे फडणवीस सरकारची कोंडी करत असतानाच रोशनी शिंदे प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री झाल्याने मारहाण करणाऱ्या महिलांना शिक्षा होण्याची शक्यता वाढली आहे.





Updated : 6 April 2023 1:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top