योगा दिनानिमीत्त शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
International Yoga Day : जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असताना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
X
जागतिक योग दिन (International Yoga Day) जगभर साजरा केला जात आहे. त्यानिमीत्ताने योगासनांचे महत्व पटवून देण्यासाठी सरकारतर्फे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग (Medical Education Department) आणि औषधी द्रव्य विभागाने घेतलेल्या कार्यक्रमात बोलताना वैदयकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी महत्वाचा निर्णय घेतला.
याववेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी योगाचे महत्व पटवून दिल्यानंतर युनायटेड नेशनने (United Nation) 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून घोषित केला. त्यामुळे या दिनाचे महत्व समजून आपण योगाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तसेच योगाचा प्रसार होण्यासाठी राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग कॉलेज यामध्ये योग युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले.