गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो, एकनाथ खडसेंचा फोन वरील संवाद व्हायरल
X
माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील वडगाव बुद्रुक गावात प्रचंड पाणी टंचाई आहे. गावात पाणी नाही यासाठी एक मुलगा थेट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेना फोन करून तक्रार करतांना चा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संवादात जामनेर तालुक्यातील वाकोद जवळचा वडगाव बुद्रुक ला पाणी नाही असं मुलगा यावर खडसे बोलतांना ...
कसं काय पाणी नाही तुझा आमदार कुठं मेला...
का...?
आमदार काय करतोय गिरीश... इकडे तिकडे बायकांमागे फिरतोय निस्ता ...
आमदार फोन उचलत नाही असं समोरील मुलगा सांगतांना खडसे पुढे म्हणतात… की पोरींचाच फोन उचलतो.
असा वादग्रस्त फोन वरील संवाद आहे.
या संदर्भात आम्ही मॅक्स महाराष्ट्रशी बातचीक केली. तेव्हा एकनाथ खडसे म्हणाले
जामनेर पाणी टंचाई संदर्भातला फोन वरील संवादतील आवाज माझाच आहे. खान्देशी भाषेत बोललो आहे आणि चुकीचेही बोललो नाही. जामनेर मध्ये पाणी टंचाई असल्याने रोज 20 ते 25 फोन येतात. खान्देशी भाषेत बोललो आहे. अश्या अडचणीच्या वेळेस लोक वणवण फिरत आहेत. आणि महाजन पश्चिम बंगाल मध्ये फिरत आहे. हे गेल्या 20 दिवसापासून मतदार संघ पाणी नाही. लोकांच्या तीव्र भावना आहेत आणि कोणाच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नाही खान्देशी भाषेत संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान भाजप सोडण्याच्या आणि राष्ट्रवादी प्रवेशा आधीही वरणगाव च्या कार्यकर्त्यांशी फोन वरील संवादाचाही असाच एक ऑडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी खडसेंनी हा आवाज आपला नसून कोणी तरी मिमिक्री केल्याचं स्पष्टीकरण दिलं होत.