एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण...
XCourtesy -Social media
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो.
असं ट्विट खडसे यांनी केलं आहे. गेल्या वर्षी 19 नोव्हेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यावेळी देखील त्यांनी ट्विट करुन माहिती दिली होती.
माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल.
त्यानंतर खडसे यांनी 31 डिसेंबर ला त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याचं सांगितलं होतं. डॉक्टरांनी त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला दिला असल्याचं ट्विट खडसे यांनी केलं होतं.